कविता वाचन

Read full article | No Comments

काल साहित्य परिषद येथे श्री. प्रसाद शिरगांवकर  आणि श्री. वैभव जोशी यांचा कविता वाचनाचा कार्यक्रम होता.  मी प्रत्यक्ष कविता कवींच्या तोंडून ऐकायची ही पहिलीच वेळ, म्हणून हा अनुभव विशेष करून सांगण्यासाठी हा लेख. अगदी मस्त  मैफल जमली होती, हे कवी आपापल्या कविता ऐकवत होते आणि त्यांना अगदी दिलखुलास दाद मिळत होती. “वा वा!” ..” ही ओळ अजून [...]

संभाजी!!

Read full article | 4 Comments

“संभाजी महाराज फार काही कर्तृत्ववान नव्हते, रंगेल होते, वाया गेलेले होते”  असे आपल्यापैकी अनेकांना असलेले गैरसमज, समूळ नष्ट करणारे हे पुस्तक “संभाजी” नुकतेच वाचले. आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे पण त्याहून कितीतरी खडतर प्रसंगांना तोंड देत औरंगजेबाला तब्बल ८ वर्षे झुंजवत.. मराठी राज्य शाबूत ठेवणारा, वाढविणारा हा महापराक्रमी योद्धा काय काय दिव्य करून लढला आणि [...]

गौरी – गणपती

Read full article | 2 Comments

गणपतीचे दिवस प्रत्येक घरात खूप छान जातात. उत्सवाचे दिवस.. आनंदाचे दिवस..गणपती यायच्या आधी किमान आठवडाभर आधी आईची तयारी सुरू होते. साफसफाई, सामान भरणे वगैरे वगैरे.. पूर्वी वाटायचे काय हे, कित्ती दिवस आहेत, किती आधीपासून हिची तयारी? यावेळी मात्र लग्न झाल्याने मला हे सगळं खूप जवळनं पहायला मिळालं. आणि यावेळचे गणपती- गौरी माझ्यासाठी विशेष अनुभव होता. [...]

सण : प्रत्येकाच्या दृष्टीकोनांतून!!

Read full article | 2 Comments

सहज गंमत म्हणून मनात विचार आला, सण म्हटलं की आपल्या आई, आजी, आजोबा, बाबा यांची मनात काय काय विचार येत असतील? माझ्या कल्पनेप्रमाणे असेच काहीतरी : आई: सण म्हणजे भरपूर काम, भरपूर माणसं आणि भरपूर उत्साह. घरातले सगळे या निमित्तानं घरी रहातील, जेवणावळी होतील. पोरं नुसता उच्छाद मांडतील पण घराला घरपण येईल. बाबा: आमच्या दृष्टीने [...]

सुपरवूमन!!

Read full article | 3 Comments

बाईच घराला घरपण देते असं म्हणतात ते अगदी खरं आहे. घराला घरपण देणारी, जोडून ठेवणारी, सर्वांमधली दुवा बनलेली अशी ही घरातली स्त्री आई, आजी, सून, बायको अशा अनेक नात्यांची माळ लेवून सतत झटत असते. घरची लक्ष्मी म्हणून सारे सण-वार, आल्या गेलेल्यांचे बघणे, घराची घडी नीट रहावी म्हणून पसारा आवरण्यापासून मनं संभाळण्यापर्यंत सारं काही करत असते. [...]

मन

Read full article | 1 Comment

बाई ही घरात इतकी गुंतून जाते की, सर्व काही सावरता सावरता स्वत:लाच विसरून जाते. पुढे कधीतरी मग तिच्या हे लक्षात येते आणि मग हा प्रवास तिच्या लक्षात येतो. तिच्या भावना सांगणारी ही कविता.     मनातले विचार मनातच बोलतात ओठांपर्यंत पोहोचण्याआधीच विरतात याच अव्यक्त विचारांची जळमटं होतात मनाचा मग कोंडमारा करतात   कोपरा न कोपरा [...]

जोडीदार!

Read full article | 3 Comments

एकदा लग्न करायचे ठरले की, सुरू होते गडबड. नोंदणी, फोटो, अपेक्षा आणि बरंच काही.. गेल्या काही वर्षांत मैत्रिणींमुळे या विषयाशी जवळून संपर्क आला. (सुदैवाने मला ह्याला सामोरे जायची वेळच आली नाही ) आणि मग ह्या कांदा-पोहे कार्यक्रमाबद्दल त्यांना काय वाटते, हे जाणून घेता आले. ही एक व्यवस्था आहे, त्यामुळे त्याचे फायदे-तोटे हे असणारच.. मला त्याविषयी [...]

मुंबईत बॉम्बस्फोट – पुन्हा एकदा..

Read full article | 4 Comments

मुंबईत बॉम्बस्फोट! काल Twitter वर बातमी वाचली आणि खरंच इच्छाही झाली नाही जाऊन टी व्ही वगैरे पहायची. आता पाठ झालंय.. नेत्यांची उत्तरं, आकडेवारी आणि नाटकातले संवाद म्हणावेत तसे मिडिया कव्हरेज.. फक्त वायफळ चर्चा.. वर्तमानपत्रात भडक मथळे.. झालं!  दोन दिवससुद्धा बातमी रहाणार नाही. पुन्हा नविन Breaking News. जनतेला जेव्हा शांत रहाण्याचे आदेश दिले जातात ना.. तेव्हा [...]

नाही ऐकायची सवय हवी!

Read full article | 2 Comments

एखादी आई आपल्या मुलाबद्दल बोलताना अगदी हमखास ऐकायला येणारे वाक्य “नाही ऐकायची सवय हवी त्याला, नाहीतर हट्टी होईल.” (तसे नाही केले तर, “अजिबात ऐकत नाही हो, फार हट्टी झाला आहे” हे वाक्य बोलले जाते ) तर मुद्दा असा, की हे मला आज का आठवलं असेल? परत काहीतरी मुलांबद्दल असेल असा जर तुमचा तर्क असेल तर [...]

चारोळी- तू नी मी

Read full article | No Comments

नेहमीच कुटुंबाच्या कर्त्या पुरूषाला प्रत्येक बाबतीत प्राधान्य दिलं जातं. विशेषत: जर ते कुटुंब खर्‍या अर्थाने पुरूषप्रधान असेल आणि बाईला दुय्यम स्थान असेल तर ती काय विचार करीत असेल ते शब्दात पकडण्याचा एक प्रयत्न.   तुझ्या काळज्या, दु:ख तुझं, सुख तुझं नी तूही तुझाच तुझ्यातल्या ’तू’ची इमारत किती भक्कमपणे उभी आहे पायातल्या दगडालाही कधीतरी ढासळावसं वाटतं [...]